You are currently viewing सभागृहाचे कामकाज की पक्षाच्या कार्यालयाचे? जि.प. गटनेते नागेंद्र परब संतापले.

सभागृहाचे कामकाज की पक्षाच्या कार्यालयाचे? जि.प. गटनेते नागेंद्र परब संतापले.

ओरोस /

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या खास सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा कळस दिसून आला. सत्ताधारी सदस्य कामाच्या याद्या वाचत होते आणि त्या कामांना मंजुरी घेत होते. त्यामुळे हे सभागृहाचे कामकाज होते की पक्षाच्या कार्यालयाचे असा प्रश्न उपस्थित करत या सभागृहात सुरू असलेले काम एका विशिष्ट पक्षाचे असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप करत या मनमानी आणि गलथान कारभाराकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत सत्ताधाऱ्यांना त्यांच्या मनमानी कारभारात एक प्रकारे अनुमती दर्शविली असून याविरोधात nyaयालयात दाद मागणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा परिषद खास सर्वसाधारण सभेत विविध योजनांचे आराखडे मनमानी पद्धतीने मंजूर झाल्यानंतर विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हा परिषद सदस्य गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, प्रदीप नारकर, रोहिणी गावडे, संपदा देसाई आदी सदस्य उपस्थित होते.
यावेळी नागेंद्र परब म्हणाले की, जिल्हा परिषद खास सभेत आज सत्ताधाऱ्यांनी मनमानी पद्धतीने आराखडे आणि याद्या मंजूर करून घेतल्या. याद्या प्रशासनाकडून वाचण्यात येणे आवश्यक होते. मात्र तसे न होता याद्या व कामाचे वाचन सत्ताधाऱ्यांचे सदस्य करत होते. त्यामुळे…

अभिप्राय द्या..