You are currently viewing चौके येथील बंद बिल्डिंगमध्ये युवकाचा सापडला मृतदेह.;दारुच्या नशेत पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज.

चौके येथील बंद बिल्डिंगमध्ये युवकाचा सापडला मृतदेह.;दारुच्या नशेत पडल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज.

चौके /-

चौके बाजारपेठेनजीक कुडाळ मार्गावर महेश कन्ट्रक्शन नावाच्या बंद पडलेल्या बिल्डिंग मध्ये मार्तंड रामराव खोत. वय ४२ सध्या राहणार देवली- नवागर या अविवाहित युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. बुधवारी दुपारी ३.३० वाजता बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या चायनिज सेंटर मधील कुकला बंद बिल्डिंग मध्ये मोठमोठयाने कुत्रे भुंकण्याचा आवाज ऐकू आला असता त्याने त्याठिकाणी जाऊन बघितले तर त्याला उताणी पडलेला मृतदेह दिसला. तेव्हा त्याने तात्काळ आपल्या मालकाला सांगितले. यानंतर चौके पोलीस पाटील तसेच मालवण पोलीसाना याबाबत माहिती दिली. सदर मृत युवकाची सुरवातीला ओळख पटत नव्हती पोलीस आल्यावर उताणी असलेला मृतदेहाची ओळख पटली.

मृत युवक हा खोत या नावाने परिसरात परीचयाचा होता. मंगळवारी रात्री काळोखात बंद बिल्डिंगच्या मागील बाजूने बिल्डिंगमध्ये दारुच्या नशेत प्रवेश करताना पडल्याने डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. युवकाचे नातेवाईक देवली काळेथर येथून आल्यावर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत अधिक तपास पो. नि. सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. सुभाष शिवगण, पो. विलास टेंबुलकर, पो. राजन पाटिल करत आहेत.

अभिप्राय द्या..