You are currently viewing वेंगुर्ला उभादांडा येथील श्री गणपतीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २० फेब्रुवारी रोजी

वेंगुर्ला उभादांडा येथील श्री गणपतीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या २० फेब्रुवारी रोजी

वेंगुर्ला /-


नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी जगभर ख्याती पावलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथील श्री गणपतीचा “वार्षिक जत्रोत्सव” उद्या रविवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. उभादांडा श्री गणपती मंदिर येथे उद्या संकष्टी चतुर्थी दिवशी हा वार्षिक जत्रोत्सव संपन्न होणार असून यानिमित्त सकाळी पूजा, श्री सत्यनारायण महापूजा तसेच रात्री ११ वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा व जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडा वाघेश्वरवाडी वेंगुर्ला व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले उभादांडा येथे मुख्य रस्त्यानजीक श्री गणपतीचे मंदिर असून तालुक्यासह,ग्रामीण भाग,मुंबई,गोवा व अन्य भागातून भाविक गणपतीच्या दर्शनासाठी, केळी, नारळ ठेवणे,नवस फेडणे यासाठी मोठ्या संख्येने येतात.१५ मार्च रोजी दुपारी महाप्रसाद होणार असून १६ मार्च रोजी श्री गणपतीचे विसर्जन होणार आहे.

अभिप्राय द्या..