मालवण /-

आंगणेवाडी वार्षिजत्रोत्सवाच्या कालावधीत करोनाचे नियम तंतोतंत पाळण्याचे आगणे कुटुंबीयांनी भाविकांना आवाहन केले आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिनांक २४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपन्न होणाऱ्या आंगणेवाडी वार्षिकोत्सवात येणाऱ्या भक्तांनी गर्दी न करता करोनाविषयी नियमांचे तंतोतंत पालन करीत सहभागी होऊन श्री देवी भराडीचे दर्शन घ्यावे असे आवाहन आगणे कुटुंबीय करीत आहेत,तसेच करोनाची तिसरी बाट जरी ओसरत असली तरी आरोग्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करोना प्रतिबंधक नियमांचे पालन अनिवार्य आहे. मुखपट्टी व सॅनिटरायझर बरोबर लसीकरणाचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे.तसेच ज्येष्ठ नागरिक,व्याधीग्रस्त नागरिकांनी उत्सवात सहभागी होणे टाळल्यास ते उचित ठरेल.वार्षिक उत्सवात सहभागी होणारे छोटे मोठे व्यापारी बंधूनी देखील त्याच्यासाठी पारीत करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन आग्रणे कुटुंबियांना सहकार्य करावे आणि हा वार्षिकोत्सव दरवर्षीप्रमाणे कुठलेही गालबोट न लागता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेत पार पडेल याची दक्षता घ्यावी.असे आंगणे कुटूंबियांनी सर्व भाविक तसेच व्यापारी वर्गाला आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page