You are currently viewing मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोन कामगारांचा मृत्यू.;मातोंड-पेंडूर रोडवरील घटना.

मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून दोन कामगारांचा मृत्यू.;मातोंड-पेंडूर रोडवरील घटना.

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील सातवांयगणी येथे पुलाचे काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर कोसळून दोन कामगार जागीच ठार झाले. हा प्रकार आज सकाळी मातोंड-पेंडुर रोडवर घडला.गोपीनाथ रामू राठोड, (वय ५२ रा. कोळयाल तांडा, ता-हुनसगी, जिल्हा- यादगिर, राज्य कर्नाटक) आणि ओमप्रकाश तेजूनायक राठोड (वय ३२ रा. शेवालाल कॉलनी, येलगी तांडा, ता-हुनसगी, जिल्हा- यादगिर, राज्य कर्नाटक) अशी मृतांची नावे आहेत. या अपघाताची नोंद वेंगुर्ले पोलिस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अभिप्राय द्या..