You are currently viewing दोडामार्ग बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक सुनील गवस यांनी रोखले..

दोडामार्ग बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक सुनील गवस यांनी रोखले..

दोडामार्ग /-

दोडामार्ग बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्याने सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक सुनील गवस आदींनी रोखले…..

दोडामार्ग तालुक्यातील मुख्य बाजारपेठ दोडामार्ग मधील बाजारपेठ आहे, संपूर्ण तालुक्यातील मुख्य रस्ते खराब झाले असता बाजारपेठेतील रस्तादेखील खराब झाला असून दोडामार्ग वासीयांना ह्याच खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता मात्र आता अनेक दिवसांनंतर बांधकाम विभागाला जाग आली असता बाजारपेठेतील खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते काही अंतरावर खड्डे बुजवले असता सामाजिक कार्यकर्ते संदेश वरक काही कारणास्तव बाजारपेठेतून जात असताना त्यांच्या निदर्शनास खड्डे बुजवण्याचे काम आले असता त्यांनी खड्डे बुजवण्याच्या कामावर चाललेला भोंगळ कारभार त्यांच्या लक्षात येताच त्यांनी हे काम बंद पाडले खड्डे बुजवण्याच्या नावावर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम बांधकाम विभागाकडून होत होते थुंकी लावल्या शिवाय दुसरे काही केले जात नव्हते प्रत्येक खड्ड्यात खडी व मुरास टाकून रोड रोलर फिरवला जात होता खड्ड्यांमध्ये डांबर न घातल्याने संदेश वरक यांनी आपल्या स्वतःच्या हाताने खड्डा खोदला असता त्यातील सर्व खडी व मुरास बाहेर आली त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की खड्ड्यांमध्ये डांबर हा प्रकारच नाही आहे त्यानंतर त्यांनी आजूबाजूला बुजवण्यात आलेले इतर खड्डे देखील खोदून पाहिले असता त्यात देखील डांबर हा प्रकारच नव्हता प्रत्येक खड्ड्यात खडी टाकून मूरास मारून वर रोडरोलर फिरवून दोडामार्ग नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम बांधकाम विभागाकडून होत असल्याचे संदेश वरक त्यांच्या निदर्शनास आले हे पाहून त्यांनी तेथील काम रोखले व तेथे असलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचा जाब विचारला यानंतर मनसे तालुकाध्यक्ष सुनील गवस हे देखील तेथे पोहोचले व त्यांनी देखील बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत संपूर्ण खड्डे पुन्हा पूजवा अन्यतः काम सुरू करू देणार नाही असा इशारा दिला .

अभिप्राय द्या..