कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज १३ डिसेंबर च्या शेवटच्या दिवशी 5 उमेदवारांनी अर्ज मागे घेलेला आहे.एकूण 13 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.त्यामुळे विशेषतः वॉर्ड क्रमांक 12 मध्ये काँग्रेसचे उमेदवार अरुण गिरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या ठिकाणी भाजप विरुद्ध आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.शिवसेना राष्ट्रवादी आघाडीतर्फे काका कुडाळकर तर भाजप तर्फे संध्या तेरसे यांच्यात थेट लढत होणार आहे. याशिवाय भाजपच्या बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीत जबरदस्त चुरस निर्माण झाली आहे

कुडाळ नगर पंचायतीच्या निवडणुकीत अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. वॉर्ड क्रमांक बाजारपेठ 4 मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार रेखा काणेकर यांच्या विरोधात मृण्मयी धुरी यांनी बंड केले आहे तर वॉर्ड क्रमांक 5 मध्ये कुडाळेश्वरवाडी येथे विद्यमान नगरसेवक सुनील बांदेकर यांनी भाजप चे अधिकृत उमेदवार अभिषेक गावडे यांना आव्हान दिले आहे. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये गांधी चौक या प्रभागात माजी खासदार निलेश राणे यांचे खंदे समर्थक आनंद शिरवलकर यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांना भाजपतर्फे उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे येथील प्रमुख दावेदार असलेल्या भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत यांच्या पत्नी अदिती सावंत यांनी बंडाचा झेंडा फडकवत अधिकृत उमेदवाराला आव्हान दिले आहे. या लढती कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. वॉर्ड क्रमांक 14 मध्ये विद्यमान नगरसेविका आणि माजी सरपंच प्रशांत राणे यांच्या सोभाग्यवती प्रज्ञा राणे यांना भाजपतर्फे उमेदवारी दिल्याने योगेश राऊळ यांनी बंडाळी केली होती मात्र याठिकाणी बंडखोर थंड झाल्याने याठिकाणी तीरंगी लढत होणार आहे.

प्रभाग क्रमांक १

१) ज्योती जयेंद्र जळवी (शिवसेना)

२) रंजना रवींद्र जळवी (काँग्रेस)

३) सखु शंभू आकेरकर (भाजप)

प्रभाग क्रमांक 2

१) अनुजा अजय राऊळ (शिवसेना)

२) पूजा प्रदीप पेडणेकर (काँग्रेस)

३) नयना दत्तात्रय मांजरेकर (भाजप)

प्रभाग क्रमांक 4

१) सोनल सुभाष सावंत (काँग्रेस) २) श्रुती राकेश वर्दम (शिवसेना)

३) रेखा प्रवीण काणेकर (भाजप)

४) मृण्मयी चेतन धुरी (बंडखोर भाजप)

प्रभाग क्रमांक 5

१) प्रवीण आनंद राऊळ (शिवसेना)

२) अभिषेक दत्तात्रय गावडे (भाजप) ३) सुनील राजन बांदेकर (बंडखोर भाजप)

४) रमाकांत अनंत नाईक (मनसे) ५) रोहन किशोर काणेकर (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 6

१) शुभांगी धनंजय काळसेकर (काँग्रेस) २) देविका जीवन बांदेकर (शिवसेना)

३) प्राजक्ता अशोक बांदेकर (भाजप)

४) आदिती अनिल सावंत (भाजप बंडखोर)

प्रभाग क्रमांक ७

१) विलास धोंडी कुडाळकर (भाजप)

२) भूषण मंगेश कुडाळकर (शिवसेना)

३) मयूर सदानंद शारबिद्रे (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक ८

१) आफरीन अब्बास करोल (काँग्रेस)
२) रेवती राजेंद्र राणे (भाजप) ३) मानसी महेश सावंत (राष्ट्रवादी)

प्रभाग क्रमांक 9

१) श्रेया शेखर गवंडे (शिवसेना)

२) साक्षी विजय सावंत (भाजप)

प्रभाग क्रमांक 11

१) गुरुनाथ काशीराम गडकर (शिवसेना) २) राजीव रमेश कुडाळकर (भाजप)

३) सिद्धार्थ तुकाराम कुडाळकर (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 12

२) हेमंत राघोबा कुडाळकर (राष्ट्रवादी)

२) संध्या प्रसाद तेरसे (भाजप)

प्रभाग क्रमांक 13

१) सई देवानंद काळप (शिवसेना)

२) तेजस्विनी नारायण वैद्य (भाजप)

३) विमल गुंडू राऊळ (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 14

१) प्रज्ञा प्रशांत राणे (भाजप)

२) मंदार श्रीकृष्ण शिरसाट (शिवसेना) ३) केतन विजय पडते (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 15

१) प्रशांत शांताराम राणे (भाजप)

२) गणेश अनंत भोगटे (काँग्रेस)

३) उदय रामचंद्र मांजरेकर (शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page