कुडाळ /-

तालुक्यातील माणगाव मध्ये जम्बुद्विप ट्रस्ट पुणे संस्थेच्या सहकार्याने त्रिमूर्ती मंगल कार्यालयामध्ये माणगाव खोऱ्यातील कुटुंबीयांना व विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले.

तुमच्या जगण्याचे प्रश्न तुम्हालाच समजावून घ्यावे लागतील.हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल.दुसरा कोणीही तुमचा उद्धार करावा लागेल.दानधर्मासारखे पवित्र कार्य करा.त्याने तुमचे जीवन समृद्ध होईल असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे वरिष्ठ अधिकारी तथा सावंतवाडी प्रेरणाभुमी संवर्धन समितीचे अध्यक्ष डी.के. पडेलकर यांनी केले.शमाणगाव दशक्रोशीतील केरवडे,नानेली,माणगाव,कालली, आंबेरी,घावनळे,निवजे,वाडोस हळदीचे नेरूर,निळेली या १० गावातील १०७ कुटुंबीयांना व ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी सत्यशोधक कार्यकर्त्या उषाकिरण सम्राट,तानाजी निकम,शांताराम असनकर,आनंद कर्पे,सौ.रश्मी पडेलकर,अंकिता कदम,सत्यवान नेरूरकर,यांसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशोधक कार्यकर्ते दीपक जाधव यांनी केले तर आभार निलेश जाधव यांनी मानले.या मदत कार्यासाठी व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक जाधव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page