कणकवली /-

घाटाच्या सुरुवातीलाच खिंडीपासून पहिल्याच यू टर्न वरील तीव्र वळणावर वेगावरील अंदाज चुकल्याने कोल्हापूरकडून फोंड्याच्या दिशेने फरशी भरून येणारा २० चाकी ट्रक वरील रस्त्यावरून खालच्या रस्त्यावर एका बाजूला कोसळला. या अपघातात ट्रक पूर्ण उलटा झाल्याने ट्रकचे अतोनात नुकसान झाले. सुदैवाने ड्रायव्हरला किरकोळ दुखापत व मार बसला.

रविवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान हा अपघात घडला. यावेळी मोठा आवाज ऐकून लगतच्या घोलप हाॅटेल, पवन भालेकर आणि अन्य स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ड्रायव्हर अल्ताफ गुलाल तांबोळी (वय 34 वर्ष, राहणार पेरले- कराड) यांना सुखरूप बाहेर काढले. काही वेळानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. सकाळी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ड्रायव्हरला जेवण-पाणी पाण्याची मदत दिली तसेच वाहतूकीतील अडथळा दूर केला. सध्या अवजड वाहनांची वाहतूक यामार्गे वाढल्याने व त्यावर कोणाचाही निर्बंध नसल्याने वारंवार असे अपघात घडून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page