You are currently viewing संत राऊळ महाराज महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा..

संत राऊळ महाराज महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा..

कुडाळ /-

संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डिसले यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमावेळी डॉ. व्ही. जी. भास्कर (इतिहास विभाग प्रमुख) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन संघर्षावर थोडक्यात मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. झोडगे (वाणिज्य विभाग प्रमुख) यांनी केले तर आभार डॉ. बी.ए. तुपेरे यांनी मानले. या कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा