You are currently viewing दुध उत्पादक शेतकरी व संस्थाचालकांचे १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण.;एम. के. गावडे

दुध उत्पादक शेतकरी व संस्थाचालकांचे १६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण.;एम. के. गावडे

वेंगुर्ला /-


प्रतिभा दुध कंपनी प्रा. लि. कोडोली कोल्हापूर यांच्याकडे थकबाकी असलेले सिंधुदुर्ग दुध उत्पादक सहकारी संस्थेचे दोन कोटी सत्याहत्तर लाख रुपये अनेक प्रयत्न करुनही मिळालेले नाहीत. त्यामुळे संस्था अडचणीत आली असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाटी १६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर दुध उत्पादक शेतकरी व संस्थाचालक एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
प्रतिभा दुध कंपनीकडे २ कोटी सत्याहत्तर लाख रुपये थकीत असल्याने दुध उत्पादक शेतकरी, दुध संस्था, वाहतुकदार, अडचणीत आलेले आहेत. पर्यायाने जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचे व्यवहार अडचणीत आलेले आहेत. गरीब शेतकऱ्यांना आपली जनावरे विकून बँकेची देणी द्यावी लागत आहेत. याकडे पालकमंत्री उदय सामंत, दुग्ध विकास मंत्री सुधीर केदार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी हे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून त्यात दुग्ध उत्पादक शेतकरी, संस्था चालक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दुध उत्पादक सहकारी संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..