You are currently viewing शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष यांना ते बेताल वक्तव्य शोभत नाही.;मोहिनी मडगावकर.

शिवसेनेच्या माजी नगराध्यक्ष यांना ते बेताल वक्तव्य शोभत नाही.;मोहिनी मडगावकर.

सावंतवाडी /-

लोकशाहीत मत मांडण्याचा, बोलण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.भाजप नेते आणि पदाधिकारी आमदार दिपक केसरकर यांच्या चुकीच्या कार्यपद्धती बाबत बोलत आहेत यात चुकीचे काही नाही. जनतेच्या प्रश्नांना लोकप्रतिनिधी हे उत्तरदायित्व असतात.बोलू न देणे, विरोधात बोललात तर फिरू देणार नाही अशी धमकी देवून केसरकर समर्थक नगरसेविका अनारोजिन लोबो यांना सावंतवाडी शहरात हुकूम शाही सुरु करायची आहे का असा प्रश्न भाजप महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी उपस्थित केला आहे.आमदार केसरकर यांच्या विरोधात बोललात तर सावंतवाडी शहरात फिरू देणार नाही असा इशारा नगरसेविका लोबो यांनी दिला होतो त्याला यांनी प्रसिद्ध पत्रकातून उत्तर दिले.

अभिप्राय द्या..