You are currently viewing एकहि पात्र मतदार मतदाना पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.;एम. के. गावडे

एकहि पात्र मतदार मतदाना पासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी.;एम. के. गावडे

वेंगुर्ले काथ्या कारखाना येथे नविन मतदार नोंदणी विशेष पुनिरीक्षण कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ला /-

     

प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.या देशातील एकहि पात्र मतदार निवडणुक मतदाना पासून वंचित राहणार नाहि यासाठी आपले नाव मतदार यादीत सर्वांनी समाविष्ट करावे . लोकशाही मजबूत करण्यासाटी शासन, निवडणुक आयोग व तहसिलदार कार्यालय यांचे मार्फत सुरु असलेल्या मोहिमेस सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचे चअरमन एम. के. गावडे यांनी वेंगुर्ले येथे केले.

       

नविन मतदार नोंदणी विशेष पुनिरीक्षण कार्यक्रमातंर्गत वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयाच्यावतीने येथील महिला काथ्या कामगार सहकारी औद्योगिक संस्था वेंगुर्लेच्या सभागृहात  घेण्यात आलेल्या कार्यक्रमात एम.के.गावडे बोलत होते.यावेळी महिला काथ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब, नायब तहसिलदार नागेश शिंदे, निवडणुक नायब तहसिलदार संदिप पानमंद, तहसिलचे कर्मचारी सतिश हराळे, तसेच प्रविणा खानोलकर व मतदार उपस्थित होते.यावेळी नागेश शिंदे व संदिप पानमंद यांनी  नमुना नंबर ६,७, ८, ८अ या फॉर्मसंदर्भात मार्गदर्शन करुन त्याचे वाटप करण्यात आले. तसेच भारत निवडणुक आयोगाच्या व्होटर हेल्पलाईन ऍपवर फॉर्म कसे भरावेत याबाबत मार्गदर्शन केले. तालुक्यात १४ नोव्हेबर तसेच २७ व २८ नोव्हेंबर या दिवशी तालुक्यातील  मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून फॉर्मचे वाटप करणार आहेत व स्विकारणार आहेत असे नागेश शिंदे यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..