You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोककलांच्या प्रमुखांची बैठक एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोककलांच्या प्रमुखांची बैठक एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

वेंगुर्ला /-


दशावतार चालक मालक कलाकार व सिंधुदुर्गातील लोककलांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक सामाजिक कार्यकर्ते एम.के.गावडे यांच्या अध्यक्षतेखाली वेंगुर्ले येथे संपन्न झाली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त सनदी अधिकारी तथा पर्यटन महामंडळ सिंधुदुर्गचे अध्यक्ष सतिश पाटणकर हे उपस्थित होते.सिंधुदुर्गातील दशावतार व इतर लोककला यांना स्वतःचे व्यासपीठ मिळावे,निवृत्त कलाकारांच्या मानधनात वाढ व्हावी,नवोदित कलाकारांना प्रशिक्षण यांसारख्या कलाकारांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.दशावतार व इतर लोककला यांच्या अनेक संघटना कलाकारांसाठी काम करीत आहेत.मात्र सर्व कला व कलाकार यांची एक संयुक्त समिती असावी,जेणेकरुन सरकार दरबारी लोककलाकारांच्या हिताचे निर्णय घेऊन न्याय मिळविता येईल.लोककलांना राजाश्रय मिळण्यासाठी एकत्रितपणे आपल्या समस्या मांडणे आवश्यक आहे.लवकरच कलाकारांची संयुक्त कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे.भविष्यात कलाकारांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले.या बैठकीस दशावतारी अकादमी अध्यक्ष दिनेश गोरे,दशावतार चालक मालक संघ अध्यक्ष तुषार नाईक,लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य सुधीर कलिंगण,दशावतार कलाकार संघटना अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर,चालक मालक संघ खजिनदार,देवेंद्र नाईक,चालक मालक संघ सचिव सचिन पालव,दशावतारी अकादमी उपाध्यक्ष समिर तेंडूलकर, हरिभाऊ भिसे,बाबू कोळेकर तसेच प्रज्ञा परब,प्रविणा खानोलकर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधीर कलिंगण व सचिन पालव यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..