कुडाळ /-
कुडाळ शहरात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना चे रुग्ण हा समूह संसर्ग वाढीस लागण्याचा धोका आहे.अशा स्थितीत आता नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये.तसेच प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन कुडाळ नगराध्यक्ष श्री. ओंकार तेली यांनी केले आहे.कुडाळ तालुक्यात काल सोमवारी १८ कोरोना रुग्ण सापडले आहेत.असे दर दिवशी कोरोना रुग्ण प्रमाण वाढतच चालले आहे.तसेच कुडाळ तालुक्यात आतापर्यंत ६७२ रुग्ण सापडले आहेत.कुडाळ शहरात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे.अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे,हात वारंवार सॅनिटायझर ने स्वच्छ करणे, साबण लावून हात धुणे, विनाकारण घराबाहेर न पडणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे याची काटेकोर अमलबजावणी करावी.
कुडाळ शहरातील व्यापाऱ्यांनी गेल्या बुधवार पासून आठ दिवस पुकारलेल्या बंदला चांगलाच प्रतिसाद देऊन सहकार्य केल्याबद्दल सर्व व्यापारी वर्गाचे धन्यवाद..दुकानांमध्ये गर्दी होऊन देता जास्तीत जास्त लवकर दुकाने बंद करून गर्दी कशी टाळता येईल या दृष्टीने सहकार्य करावे.कुडाळ शहरात कोरोनाची वाढत चाललेली रुग्ण संख्या ही येत्या काळात समूह संसर्गला निमंत्रण देण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.प्रशासनाला सहकार्य करत असताना प्रत्येकाने आरोग्याच्या दृष्टीने ही काळजी घेण्याचे आवाहन लोकसंवाद लाईव्ह शी बोलताना कुडाळ नगर पंचायत नगराध्यक्ष श्री.ओंकार तेली यांनी म्हटले आहे.तसेच कुणाला सर्दी ताप खोकला अशी लक्षणे असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, कंटेनमेंट झोन मधील नागरिकांनी घराबाहेर फिरू नये.आतापर्यंत कुडाळ शहरवासीय ,व्यापारी यांनी ज्याप्रमाणे नगरपंचायतला सहकार्य केले तसेच सहकार्य करावे असे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी लोकसंवाद लाईव्ह शी बोलताना म्हटले आहे.