You are currently viewing आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत तरंदळेत सेनेला धक्का ; ग्रा.पं सदस्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश..

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत तरंदळेत सेनेला धक्का ; ग्रा.पं सदस्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश..

कणकवली /-

तालुक्यातील कणकवली लगतच्या तरंदळे येथील शिवसेनेत गेलेल्या भाजपाच्या ग्रा.पं.सदस्यांसह कार्यकर्त्यानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही भाजपात दाखल झाले आहेत. तरंदळे गावात हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. माजी सरपंच राजेश फाटक, ग्रा.पं. सदस्य विवेक परब, वैशाली घाडी, निखिल घाडी, शैलेश घाडीगांवकर, कालिदास नाईक, विजय घाडीगांवकर, सुभाष घाडीगांवकर, सुरेश परब, वासुदेव घड8घाडीगांवकर, प्रकाश गावकर आदींनी आज रात्री उशिरा ओम गणेश बंगल्यावर भाजपात पुन्हा प्रवेश केला.यावेळी माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राजू हिर्लेकर, संदीप सावंत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..