कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठा व पथ दिव्यांची थकबाकी चे कारण पुढे करुन महावितरण ग्रामपंचायतींचे पथ दिवे व पाणी पुरवठा विजपुरवठा खंडीत करीत आहे. आम्ही आपणास विनंती करतो की, तालुक्यातील आपल्या वेगवेगळ्या उप विभागामर्फत ग्रामपंचायतीचे पाणी पुरवठा व पथ दिव्यांचे विज कनेक्शन बंद करण्याचे उपद्व्याप सुरु आहेत. पथ दिव्यांची मागील सर्व 31 मार्च 2018 पर्यंतची थकबाकी ही राज्य शासनाने भरावी व 31 मार्च 2018 नंतर आस्थापीत झालेल्या म्हणजे नवीन कनेक्शन झाले असल्यास त्याची बाकी ग्रामपंचायत ने भरावी असा शासन निर्णय झाला आहे तसेच यापूर्वी ही राज्य शासनाने राज्यातील ग्रामपंचायतीच्या हिश्यातील 14 व्या वित्त आयोग मधील चार हप्त्यातून 1370 कोटी रुपये आपल्या महावितरण कंपनीस दिले आहेत त्याचा हो आपण अद्याप हिशोब दिला नाही कोणत्या ग्रामपंचायतींचे किती पैसे बाकी होते, कधी पासुन होते याचा काहीही ताळमेळ दिला नाही असे असताना आपल्या विभागा मार्फत ग्रामपंचायतीचे कनेक्शन तोडण्याचे उपद्व्याप सुरु आहेत.

आम्ही आपणांस विनंती करतो की, जिल्ह्यातील कोणत्याही ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठा व पथ दिव्यांचे कनेक्शन तोडु नये व तोडले असल्यास ते तात्काळ चालु करावे तसेच तोडण्याची कार्यवाही झाल्यास उपोषणात्मक आंदोलन संदर्भात कोणताही पत्रव्यवहार न करता तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांना एकत्र करून आपल्या विरोधात सिंधुदुर्ग विभागीय कार्यालया समोर उपोषणात्मक आंदोलन करण्यात येईल. या कालावधीमध्ये तालुक्यातील ग्रामिण भागातील कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याची सर्वस्वी जबाबदारी आपली असणार आहे याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page