You are currently viewing कोळपे जमातवाडी येथील दोन गटात वादातून परस्परविरोधी गुन्हा दाखल..

कोळपे जमातवाडी येथील दोन गटात वादातून परस्परविरोधी गुन्हा दाखल..

वैभववाडी /-

कोळपे जमातवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन परस्परविरोधी फिर्याद देऊन वैभववाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील प्रत्येकी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी रमजान सरदार नाचरे व दिलदार सरदार नाचरे हे शनिवारी 23 ऑक्टोबर रोजी जमातवाडी येथे जेवणाच्या कार्यक्रमात गेले असता जेवण करताना आपल्या डब्यात जेवण कमी वाढले या वरून नसीम नाचरे व गनी नाचरे यांना जाब विचारला असता दोन गटात बाचाबाची झाली. दोघा मध्ये किरकोळ वाद झाले. गणी नाचरे यांना घरात घुसून ररमजान व दिलदार यांनी मारहाण केली. अशी फिर्यादी गणी इमाम नाचरे रा. कोळपे जमातवाडी यांनी वैभववाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर परस्पर विरोधी आरोपी गनी इमाम नाचरे व त्यांचा मुलगा नसीम गनी नाचरे यांनी फिर्यादी दिलदार सरदार नाचरे यांच्या घरात घुसून आरोपी गनी इमाम नाचरे व नसीम गणी नाचरे या पिता – पुत्राने फिर्यादी यांना आमचे घर तुम्ही खाली करण्यास सांगणारे कोण ? अशी विचारणा करण्यास गेले असता आरोपी गनी व नसीम यांनी फिर्यादी दिलदार नाचरे याना शिवीगाळ करून शाब्दिक वादावाद झाले. या बाबत दिलदार यांच्या फिर्यादी वरून गणी इमाम नाचरे व नसीम गनी नाचरे यांच्या विरोधात वैभववाडी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करून गुन्हे दाखल केकेले आहेत. या घटनेचा तपास पोलिस नाईक योगेश तांडेल करीत आहेत.

अभिप्राय द्या..