You are currently viewing सामाजिक बांधिलकी संस्था नालासोपारा यांच्या वतीने आडेली खुटवळवाडी व भटवाडी शाळेत वह्या वाटप

सामाजिक बांधिलकी संस्था नालासोपारा यांच्या वतीने आडेली खुटवळवाडी व भटवाडी शाळेत वह्या वाटप

वेंगुर्ला
सामाजिक बांधिलकी संस्था नालासोपारा यांच्या वतीने आडेली खुटवळवाडी शाळा नं.२ व आडेली भटवाडी पूर्ण प्राथमिक शाळेतील एकूण ७० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.यावेळी दिलीप सोनसुरकर, भिसाजी सोनसुरकर, चंद्रकांत सोनसुरकर, उमेश शेणई, रोशन परब,मुख्याध्यापक गीता ठाकूर,
शिक्षक चव्हाण,झोरे,जककुलवाड,पास्ते आदीं उपस्थित होते.यावेळी आडेली भटवाडी शाळेचे मुख्याध्यापक जयंत वजराटकर तसेच आडेली खुटवळवाडी शाळा मुख्याध्यापक गीता ठाकूर यांनी शाळेतर्फे संस्थेचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सभासद सुनिल सोनसुरकर,भाई पेडणेकर यांनी मोलाची मदत केली.

अभिप्राय द्या..