सिंधुदुर्ग /-

सनातन संस्थेने अध्यात्मशास्त्र, सात्त्विक धर्माचरण, नित्य आचरणाशी संबंधित कृती, भारतीय संस्कृती आदी अनेक विषयांवरील अनमोल आणि सर्वांगस्पर्शी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. सनातनच्या ग्रंथातील दिव्य ज्ञान समाजापर्यंत पोचण्यासाठी संस्थेच्या वतीने भारतभर ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे. हे ग्रंथ समाजातील प्रत्येक जिज्ञासू, मुमुक्षू, साधक आदींपर्यंत पोचून प्रत्येकाच्या जीवनाचे सार्थक व्हावे, यासाठी हे ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ आरंभ करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकांनी या ग्रंथांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री.एकनाथ सावंत यांनी केले आहे.
श्री.एकनाथ सावंत यांनी सांगितले की, सनातनच्या अनमोल ग्रंथसंपदेमध्ये ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेत ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’, ‘अभ्यास कसा करावा’ आदी ग्रंथ; ‘धर्मशास्त्र असे का सांगते?’ या ग्रंथमालिकेत ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’, ‘सात्त्विक रांगोळी’, ‘अलंकारशास्त्र’ आदी ग्रंथ; ‘आचारधर्म’ या ग्रंथमालिकेत दिनचर्या, सात्त्विक आहार, वेषभूषा, केशभूषा, निद्रा आदींविषयी ग्रंथ; ‘देवतांची उपासना’ या ग्रंथमालिकेत देवतांची वैशिष्ट्ये सांगणारे ‘श्री गणेश’, ‘शिव’, ‘श्रीराम’, ‘श्रीकृष्ण’, ‘श्रीदत्त’, ‘मारुती’ आदी ग्रंथ; आयुर्वेदाविषयी ग्रंथमालिका; यांसह ‘धार्मिक आणि सामाजिक कृतींविषयीचे ग्रंथ; ‘प्रथमोपचार’, ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’, ‘घरात औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी’, ‘पूर-भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी स्वत:चे रक्षण कसे करावे’ आदी अनेक विषयांवरील 347 ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. हे ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तमिळ, मल्याळम्, बंगाली आदी 17 भाषांमध्ये उपलब्ध आहेत. या ग्रंथांच्या आतपर्यंत 82 लाख 48 हजार प्रती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. हे ग्रंथ केवळ साधक वा श्रद्धाळूंसाठीच नव्हे, विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी, अधिवक्ता, डॉक्टर, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, उद्योजक, राष्ट्रप्रेमी आदी सर्वच क्षेत्रांतील जिज्ञासूंसाठी उपयुक्त आहेत.
या अभियानाच्या निमित्ताने देशभरात ग्रंथप्रदर्शने, संपर्क अभियान, ग्रंथांचे महत्त्व सांगणारी हस्तपत्रके, डिजिटल पुस्तिका, वृत्तवाहिन्यांवर विशेष कार्यक्रम, ‘सोशल मीडिया’द्वारे व्यापक प्रसार आदी अनेक माध्यमांतून प्रचार करण्यात येत आहे. सनातननिर्मित हे नित्योपयोगी ग्रंथ प्रत्येक समाजघटकासाठी, तसेच आबालवृद्धांसाठी उपयुक्त आहेत. हे ग्रंथ स्वत: खरेदी करा; विविध मंगलप्रसंगी हे ग्रंथ भेट म्हणून द्या; मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक आदींनाही या ग्रंथांची माहिती द्या; शाळा-महाविद्यालये, ग्रंथालये आदी ठिकाणी प्रायोजित करा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हे ग्रंथ ‘ऑनलाईन’ खरेदी करण्यासाठी SanatanShop.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा SanatanShop हे अ‍ॅप डाऊनलोड करा, तसेच अधिक माहितीसाठी 9322 315 317 या क्रमांवर संपर्क करा, असेही श्री.एकनाथ सावंत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page