You are currently viewing राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या संघाची निवड,कोल्हापुर येथे २३ ते २५ ऑक्टोबर होणार स्पर्धा..

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गच्या संघाची निवड,कोल्हापुर येथे २३ ते २५ ऑक्टोबर होणार स्पर्धा..

सिंधुदुर्ग /-

महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापूर येथे २३ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यस्तरीय वरिष्ठ गट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार असून या संघाची निवड रविवारी करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग असोसिएशनच्यावतीने कणकवली येथील कंझ्यूमर्स सोसायटीच्या सभागृहात जिल्हास्तरीय तलवारबाजी (फेन्सिंग) निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा फेन्सिंग अससोसिएशनचे अध्यक्ष अच्युत वणवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे सचिव भालचंद्र कुलकर्णी, सिंधुदुर्ग फेन्सिंग असोसिएशनचे सचिव एकनाथ धनवटे, सिंधुदुर्ग अथॅलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव समीर राऊत, शेवंता नाईक, जयश्री कसालकर, नितीन तावडे, साईप्रसाद दळवी, सुनील पाटील, पंच अंकुर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..