You are currently viewing कणकवलीतून दुचाकी गेली चोरीला..

कणकवलीतून दुचाकी गेली चोरीला..

कणकवली /-

कणकवली गांगोमंदिर जवळील विजवीतरण कार्यालयाबाहेर उभी करून ठेवलेली वायरमनची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

विनायक नारायण देवणे हे कणकवली तालुक्यातील तरंदळे येथे वायरमन म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी कणकवली गांगोमंदिर जवळील विजवीतरणच्या कार्यालयासमोर त्यांची दुचाकी क्रमांक (एम.एच.०७-आर- ५२४७ ) उभी करून ठेवली होती. घाई गडबडीत दुचाकीची चावी त्यांनी काढलेली नव्हती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते कार्यालयाबाहेर आल्यावर त्यांना दुचाकी दिसली नाही. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांजवळ त्याबाबत चौकशी केली. त्यांनाही काही माहिती नव्हती. शोधाशोध करूनही ती दुचाकी न मिळाल्याने देवणे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार नोंदविली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

अभिप्राय द्या..