You are currently viewing तुळस येथे २३ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर..

तुळस येथे २३ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर..

वेंगुर्ला /-


वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, ग्रामपंचायत तुळस व आर.सी. सी. देऊळवाडा, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने शनिवार २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९ वा. श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था मुंबई, बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सद्यस्थितीत कोरोना महामारी संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.याचा जास्त परिणाम हा रक्तदान सारख्या घटकावर झाला असून रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णासाठी रक्ताचा तुटवडा पडत आहे. यामुळे सद्यस्थितीत रक्ताची गरज लक्षात घेऊन कोरोना काळातील चौथं तर सलग १८ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरात उपस्थित राहून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे, तसेच नावनोंदणी व अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर (७८७५८२८५८८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तुळस सरपंच शंकर घारे व आर.सी.सी.देऊळवाडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..