You are currently viewing रोटरी क्लब चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. गौरीश धोंड यांची वेंगुर्ले न. प. ला भेट..

रोटरी क्लब चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. गौरीश धोंड यांची वेंगुर्ले न. प. ला भेट..

वेंगुर्ला /-


रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मा. गौरीश धोंड व फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड यांनी वेंगुर्ले नगर परिषदेला भेट दिली. यावेळी त्यांनी नगरपरिषदेच्या कामाचे कौतुक केले.तसेच कलादालनाला भेट देऊन समाधान व्यक्त केले.
नगर परिषदेला भेट दिल्यानंतर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर राजेश घाटवळ, वेंगुर्ले रोटरी क्लब अध्यक्ष सदाशिव भेंडवडे, सेक्रेटरी सुरेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष वसंतराव पाटोळे, रोटरियन दादा साळगावकर, राजन गावडे, नगरसेवक प्रशांत आपटे आदी उपस्थित होते. या भेटीदरम्यान वेंगुर्ले नगरपरिषद राबवित असलेल्या वेगवेगळे उपक्रम याबाबत त्यांनी नगरपरिषदेचे कौतुक केले.

अभिप्राय द्या..