कुडाळ /-

सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाल्यानंतर या विमानतळावर असा एक प्रसंग आला की मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. त्याच अस झाल धावपट्टीवर कोल्हा आला होता हा कोल्हा धावपट्टीवर असल्याचे विमानाच्या पायलेटला समजले त्यांनी तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्या नंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. याबाबत प्रवाशांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.

चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचे टोळके आहे आणि हे कोल्हे आपल्या भक्षकासाठी फिरत असतात दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला मुंबईवरून सिंधुदुर्ग विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या पायलटला धावपट्टीवर प्राणी असल्याचे निदर्शनास आले हे विमान धावपट्टीवर न उतरता पायलेटने पुन्हा विमान आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला धावपट्टीवर कोणता तरी प्राणी असल्याचे सांगितले तात्काळ सुरक्षा यंत्रणेकडून धावपट्टीवर पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास कोल्हा असल्याचे दिसून आले या सुरक्षा यंत्रणेने कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढले त्यानंतर दहा मिनिटांनी या धावपट्टीवर हे विमान उतरविण्यात आले मात्र याची चर्चा प्रवाशांमध्ये चांगलीच रंगली होती या विमानतळाच्या सर्व बाजू संरक्षण भिंतीने बंदिस्त केले आहेत तरी हा कोल्हा कोणत्या मार्गाने धावपट्टीवर आला याचा शोध मात्र सुरक्षा यंत्रणा घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page