सिंधुदुर्ग /-

कणकवली तालुक्यातील अपहरण केलेल्या अल्पवयीन युवतीचा कणकवली पोलिसांनी चिपळूण येथे जात शोध घेतला असून त्या युवतीला कणकवलीत आणल्यानंतर अंकुर निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन युवतीला अज्ञात युवकाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने 12 ऑक्टोबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात दिली होती. सदर घटना 1 ऑक्टोबर रोजी घडली होती. मोबाईल लोकेशन वरून चिपळूण येथे सुगावा लागत असल्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शेखर शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील, एएसआय बापू खरात, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुप्रिया भागवत यांनी 14 ऑक्टोबर रोजी चिपळूण गाठले. चिपळूण मध्ये शोध घेतला असता ती युवती आपल्या ओळखीच्या इसमासोबत राहत असल्याची माहिती मिळाली. अधिक शोध घेतला असता अपहरण झालेली युवती खोलीत सापडून आली. मात्र तो इसम सापडून आला नाही. कणकवली पोलिसांच्या पथकाने त्या अल्पवयीन युवतीला 15 ऑक्टोबर रोजी पहाटे कणकवलीत आणले. अधिक चौकशी केली असता पळवून नेलेल्या इसमकडून त्या युवतीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तपासात पुढे आले असून त्या इसमाविरोधात पोक्सो सह भा. दं. वि.376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान त्या अल्पवयीन युवतीला अंकुर निवारा केंद्रात ठेवण्यात आले असून कणकवली पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page