You are currently viewing राष्ट्रीय शिक्षण दिनी ११ नोव्हेबर पासून राज्यात चौथीपर्यंतच्या वर्गांची घंटा वाजणार..

राष्ट्रीय शिक्षण दिनी ११ नोव्हेबर पासून राज्यात चौथीपर्यंतच्या वर्गांची घंटा वाजणार..

सिंधुदुर्ग /-

सध्या राज्यभरात कोरोना मुक्तिचे प्रमाण वाढले असून कोरोनावरील प्रतीबंधात्मक लस टोचण्याच्या मोहीमेनेही जोर पकडल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही खूपच घटल्याचे अनेक अहवाल प्रकाशीत होताना पहावयास मिळतात. त्यामुळेच जणू पहीली ते चौथीचे वर्ग दिवाळी नंतर म्हणजे साधारण ११ नोव्हेंबर पासून राष्ट्रीय शिक्षण दिनी सुरू करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला जात तसल्याची चर्चा आहे.

सध्या मुंबई महानगरपालिका, पुणे, सोलापूर, सातारा इ. जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यामधील कोरोणाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून त्या शहरी भागातील आठवी ते बारावीचे आणि ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन शाळा सुरू आहेत.

राज्यातील जवळपास ४५ हजार शाळा सुरू झाल्या असून ६५ लाखापर्यंत विद्यार्थी शाळेला दररोज जात आहेत. कोरोना संबधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करून शाळा सुरू आहेत. दुसरीकडे पहीली ते चौथी चे वर्ग अद्यापहि सुरू नाहीत. तरीही कोरोनाचे नियम पाळून शहर व ग्रामीण मधील लाखो विद्यार्थ्यांना विशेतः ज्यांच्याकडे अँड्राईड मोबाईल नाहीत त्यांना ऑफ लाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्याच धर्तीवर आता पहीली ते चौथीचे वर्ग सुरू केले जाणारआहेत. दुसरीकडे शहरातील शाळा मधील निर्बंध शितल करून कोरोनाच्या प्रभावा मधीलही सर्वच शाळा सुरू होणार असल्याचे वृत आहे.

अभिप्राय द्या..