You are currently viewing “कोरोनाच्या काळात आरोग्य, पोलिस, महसूल कर्मचारी व शिक्षकांनी केलेले काम कौतुकास्पद”.;आमदार वैभव नाईक यांनी काढले गौरवोद्गार

“कोरोनाच्या काळात आरोग्य, पोलिस, महसूल कर्मचारी व शिक्षकांनी केलेले काम कौतुकास्पद”.;आमदार वैभव नाईक यांनी काढले गौरवोद्गार

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांचे आयोजन..

कणकवली./-

कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सवामध्ये शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या सौजन्याने व आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते कणकवली येथील कोविड योद्धयांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार आर.जे पवार, आरोग्य विभागाच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पि एम.शिकलगार, सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत बुचडे, कणकवली पोलीस स्टेशन यांच्यावतीने पोलीस कॉन्स्टेबल कैलास इंपाळ, डॉ.सुहास पावसकर, डॉ.किशोरी कदम, डॉ.मनुजा भोसले, डॉ.डेनिस नाडार यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच कोविड काळात सर्व आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, शिक्षक आदींनी उल्लेखनीय कर्तव्यदक्ष कामगीरी केल्याबद्दल शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक व युवानेते संदेश पारकर यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल शिवसेना पक्षाने घेऊन सन्मान केल्याबद्दल कोविड योद्धयांनी देखील आभार व्यक्त केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, विधानसभा संघटक सचिन सावंत, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, उपतालुकाप्रमुख राजु राणे, अनिल हळदिवे, सौरभ पारकर, रामु विखाळे, वागदे उपसरपंच रुपेश आमडोस्कर, ललित घाडीगांवकर, विलास गुडेकर, भालचंद्र दळवी, संजय पारकर, ए.पी.सावंत, अजित काणेकर, प्रतीक साटम, पराग म्हापसेकर, महिला आघाडीच्या प्रतिक्षा साटम, साक्षी आमडोसकर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, शोभा बागवे, संजना कोलते, दिव्या साळगावकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अँड.हर्षद गावडे तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बाळू मेस्त्री यांनी केले.

अभिप्राय द्या..