You are currently viewing विजयराव नाईक बी. फार्मसी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल १००%

विजयराव नाईक बी. फार्मसी महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा निकाल १००%

कणकवली /-

युवक कल्याण संघ संचलित, विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल महाविद्यालयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी मार्फत शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ मध्ये घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षेचा प्रथम वर्ष सत्र 2 बी. फार्मसीचा निकाल १०० टक्के लागला आहे.

या परीक्षेमध्ये भक्ती वायंगणकर (९.८६ SGPA) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तसेच ०५ विद्यार्थ्यांनी (९.७२ SGPA) गुण मिळवून द्वितीय क्रमांक व १२ विद्यार्थ्यांनी (९.६६ SGPA) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्रेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे, खजिनदार मंदार सावंत, प्राचार्य पुजा पटेल, बी. फार्मसी विभाग प्रमुख प्रा. अमर कुलकर्णी व डी. फार्मसी विभाग प्रमुख प्रा. चंद्रशेखर बाबर, प्रा. मेघा बाणे, प्रा. ऋषीकेश काटकर, प्रा. श्वेता पाटील, प्रा. निशा करंदीकर, प्रा. नमिता सागवेकर, प्रा. प्रणिता चव्हाण व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

अभिप्राय द्या..