You are currently viewing सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान व जिवणधारा ब्लड बँक यांच्या सहकार्याने वैभववाडीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न..

सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान व जिवणधारा ब्लड बँक यांच्या सहकार्याने वैभववाडीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न..

वैभववाडी /-

दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ वैभववाडी यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दुर्गामाता उत्सव मंडळ, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान व जीवनधारा ब्लड बँक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडी येथे दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. धार्मिक कार्यक्रमां बरोबर सामाजिक बांधिलकी जपत वैभववाडी येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे, माजी अध्यक्ष शांताराम रावराणे, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, उपसभापती अरविंद रावराणे, डॉक्टर उपाध्ये जीवनधरा ब्लड बँक कोल्हापूर प्रतिनिधी डॉ. उपाध्ये, सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश पडवळ, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, सचिव संजय रावराणे, उपाध्यक्ष संजय सावंत, मनोज सावंत, अविनाश साळुंखे, गणेश मसुरकर, सुनील भोगले, तेजस आंबेकर, संतोष कुडाळकर, सुरेंद्र नारकर, प्रथमेश रावराणे, संतोष रावराणे, शैलेंद्र परब, गंगाधर केळकर व सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..