You are currently viewing भाजपा महिला मोर्चा,वेंगुर्ले च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापुजन कार्यक्रम

भाजपा महिला मोर्चा,वेंगुर्ले च्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त कन्यापुजन कार्यक्रम

वेंगुर्ला /-


प्रदेश महिला मोर्चा च्या वतीने महिला अध्यक्षा उमाताई खापरे यांनी संपुर्ण महाराष्ट्रात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून गोर – गरीब कुमारीकांचे औक्षण करून पुजन करून त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन महिला मोर्चा च्या कार्यकर्त्यांना केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ले भाजपा महिला मोर्चा च्या वतीने दाभोली नाका येथील मातोश्री कला क्रीडा मंडळाच्या नवरात्रोत्सवाच्या ठिकाणी त्याचप्रमाणे कॅम्प येथील कातकरी समाजातील मुलींचे औक्षण करून कन्यापुजन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर,महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर, ता.चिटणीस सुजाता देसाई, महिला मोर्चा च्या ता.सरचिटणीस वृंदा गवंडळकर, जिल्हा चिटनीस – नगरसेविका पुनम जाधव , नगरसेविका श्रेया मयेकर , कृपा मोंडकर, साक्षी पेडणेकर, वृंदा मोर्डेकर,रसिका मठकर, कनयाळकर तसेच महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

अभिप्राय द्या..