You are currently viewing प. पु. सद्गुरू राणे महाराज मठात ९३ व्या जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम!आज सायंकाळी पालखी सोहळा..

प. पु. सद्गुरू राणे महाराज मठात ९३ व्या जयंती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रम!आज सायंकाळी पालखी सोहळा..

मसुरे /-

वराड कुसरवेवाडी येथील प. पु. सद्गुरू राणे महाराज मठात महाराजांचा ९३ वा जयंती उत्सव व मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळ्यास १३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ रोजी सकाळी प. पू. राणे महाराज मूर्तीवर अभिषेक, हरिपाठ, नामजप, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी शिवरामेश्वर भजन मंडळ आचरा यांचे भजन, समर्थ भजन मंडळ कट्टा यांचे भजन आदी कार्यक्रम झाले. १४ रोजी दुपारी महाप्रसाद झाला. आज १५ रोजी स्वरगंधार (संजय दळवी तळगाव यांचा भक्तीगीत) कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद सायंकाळी ४ वाजता पालखी सोहळा (गुरुनाथ म्हाडगूत, कट्टा यांचे घर ते राणे महाराज मठ), सायंकाळी ७ वाजता नागेश्वर मंडळ यांचे भजन, रात्री ८ नंतर स्थानिक भजन कार्यक्रम होणार असल्याची माहिती प. पू. राणे महाराज सेवा ट्रस्ट कुसरवेवाडी वराड कट्टा यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..