You are currently viewing किसना डायमंड ज्वेलरी प्रदर्शन विक्रीत खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.;दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची अस्सल हिऱ्यांच्या दागिने खरेदीसाठी पसंती..

किसना डायमंड ज्वेलरी प्रदर्शन विक्रीत खरेदीसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.;दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांची अस्सल हिऱ्यांच्या दागिने खरेदीसाठी पसंती..

श्री बेलवलकर ज्वेलर्समध्ये १९ ऑक्टोबर पर्यंत अस्सल हिऱ्याचे दागिने खरेदीची सुवर्णसंधी..

कणकवली /-

कणकवली /-

भारतातील सुप्रसिद्ध अस्सल डायमंड ज्वेलरी च्या श्री बेलवलकर ज्वेलर्स बाजारपेठ कणकवली येथील भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ रोटरी प्रेसिडेंट डॉ. विद्याधर तायशेट्ये यांच्या हस्ते करण्यात आला. अगदी 4 हजार 900 रुपयांपासून उपलब्ध असलेल्या किसना डायमंड ज्वेलरीच्या अस्सल हिऱ्यांच्या दागिने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. भारतात 4 हजार 500 हून अधिक आउटटलेट असलेल्या सर्वात विश्वसनीय किसना डायमंड ज्वेलरीचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ श्री बेलवलकर ज्वेलर्स मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. याप्रसंगी श्री बेलवलकर ज्वेलर्स चे दीपक बेलवलकर, दिपश्री बेलवलकर, किसना डायमंड ज्वेलरीचे सेल्स मॅनेजर तन्मय मिराशी, सिंधुदुर्ग सेल्स मॅनेजर, राकेश बेंद्रे, रायगड सेल्स मॅनेजर दीपक सिंग, दादा बेलवलकर, रोटरीयन दादा कुडतरकर, डॉ. हेमा तायशेट्ये, नितीन म्हापणकर, ऍड. निकिता म्हापणकर आदी उपस्थित होते. उद्घाटनंतर हिऱ्याचे दागिने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.

यावेळी बोलताना किसना डायमंड चे सेल्स मॅनेजर तन्मय मिराशी म्हणाले, की घर घर किसना हे किसना डायमंड ज्वेलरीचे स्वप्न आहे. सामन्यातील सामान्य माणसालाही अस्सल हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करता येईल, अशी प्राईस रेंज या प्रदर्शनात उपलब्ध आहे. फिंगर रिंग 4 हजार 900 रुपयांत उपलब्ध आहे. 8 हजार 900 रुपयांपासून कानातील रिंग्ज, 19 हजार रुपयांपासून मंगळसूत्र, 40 हजारांत नेकलेस 50 हजारांत मंगळसूत्र, कानातील रिंग्ज आणि बोटातील अंगठी चा एकत्र सेट उपलब्ध आहे. श्री. बेलवलकर ज्वेलर्स चे दीपक बेलवलकर यांनी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर किसना डायमंड ज्वेलरी चे अस्सल हिऱ्याचे दागिने कणकवली आणि सिंधुदुर्ग वासीयांना खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. 19 ऑक्टोबर पर्यंत प्रदर्शन आणि विक्री सुरू राहणार असून ग्राहकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन दीपक बेलवलकर यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..