You are currently viewing आचरा कणकवली एसटी बस रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार.;प्रवाशांच्या मागणीला यश..

आचरा कणकवली एसटी बस रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार.;प्रवाशांच्या मागणीला यश..

मालवण /-

कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात बंद असलेली आचरा कणकवली एसटी सेवा कणकवली रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित करून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती बांदिवडे गावचे माजी सरपंच सतीश प्रभू यांनी दिली आहे. याबाबत प्रवाशांच्या मागणीनुसार सतीश प्रभू यांनी कणकवली आगार व्यवस्थापकांचे लक्ष वेधले होते. सकाळी ९ वा. ची मालवण- हिर्लेवाडी – आचरा मार्गे – कणकवली व सायंकाळी ३. ४५ वाजता मालवण- आचरा मार्गे कणकवली जाणारी एस.टी. विद्यमान स्थितीत केवळ कणकवली एसटी स्टँड पर्यंत जात होती. मात्र प्रवाशांच्या मागणीनुसार सतीश प्रभू यांनी कणकवली आगार व्यवस्थापकांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधत वस्तुस्थिती लक्षात आणून देऊन या दोन्ही एसटी बस फेऱ्या कणकवली रेल्वे स्टेशन पर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली होती. कणकवली आगार व्यवस्थापकांनी या मागणीची दखल घेऊन आचरा वाहतूक नियंत्रण कक्षाचे वाहतूक नियंत्रक श्री. कुणकवळेकर यांना सूचना देत बस कणकवली रेल्वे स्टेशन पर्यंत जाणार असल्याची माहिती प्रवाशांना होण्यासाठी गाडी फलकावर लिहून कळवावे असेही सांगितले. त्यानुसार प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देऊन आगार व्यवस्थापकांनी आचरा – कणकवली सकाळी ९.३० व सायंकाळी ४.३० वा. ची बस फेरी कणकवली रेल्वेस्टेशन पर्यंत विस्तारित केली आहे. याबाबत सतीश प्रभू यांनी प्रवाशांच्या वतीने कणकवली आगर व्यवस्थापकांचे आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..