You are currently viewing वायरी येथे १६ ऑक्टोबर रोजी मानवता विकास रॅलीचे आयोजन!

वायरी येथे १६ ऑक्टोबर रोजी मानवता विकास रॅलीचे आयोजन!

मसुरे /-

मानवता विकास परिषदेच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम
लोकनेते आर जी चव्हाण मंगल कार्यालय वायरी मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी सकाळी १० वाजता मालवण देऊळवाडा ते बाजारपेठ व कार्यक्रम स्थळ अशी समृद्ध आणि सामर्थ्य शील भारत बनविणे या उपक्रमांतर्गत मानवता विकास रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत,
मातृत्व आधार फाउंडेशन अध्यक्ष संतोष लुडबे, आपा चव्हाण,मालवण शहर रिक्षा संघटना अध्यक्ष पप्या कद्रेकर दादा वेंगुर्लेकर आदी उपस्थित
राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष लुडबे, श्रीकांत सावंत यांनी केले आहे.
.

अभिप्राय द्या..