You are currently viewing राजापुरमध्ये भाजपला धक्का आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक शिवसेनेत दाखल..

राजापुरमध्ये भाजपला धक्का आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत भाजपचे नगरसेवक शिवसेनेत दाखल..

रत्नागिरी /

आज शिवसेना भवन, राजापुर येथे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांचे प्रमुख उपस्थितीत राजापुर नगरपरिषद चे भारतीय जनता पार्टी चे विद्यमान नगरसेवक गोविंद चव्हाण व त्याचे सहकारी ह्यांनी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्यामुळे आता राजापुर नगरपालिका ही भाजपमुक्त करण्यात राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांना प्रचंड यश मिळाले आहे.नगरसेवक गोविंद चव्हाण यांच्या समवेत प्रवेश केलेले कार्यकर्ते *बुथप्रमुख निनाद शिर्सेकर, बचतगट अध्यक्ष नेहा चव्हाण, संपदा वाघरे, खजिनदार बचतगट जयश्री महादये, स्मिता चिबुलकर, वैशाली पावसकर, मृणमयी चव्हाण, संजय मोहिते, साईराज चव्हाण, चैतन्य शेट्ये, तन्मय शिवलकर, समीर नावेलकर ह्यांच्या सह अनेक ग्रामस्थांनी जाहीर प्रवेश केला. त्याप्रसंगी तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर सभापती करुणा कदम, उप तालुकाप्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, राजन कुवळेकर, विभागप्रमुख कमलाकर कदम, संतोष हातणकर, पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, प्रशांत गावकर, उप विभाग प्रमुख नंदू मिरगुले, शहर संघटक जितेंद्र मालपेकर, महिला शहर आघाडी वीणा विचारे, युवासेना शहर अधिकारी प्रज्योत खडपे, नगरपरिषद गटनेता विनय गुरव, उप शहरप्रमुख प्रभाकर गुरव, नगरसेवक अनिल कुडाळी, सौरभ खडपे, नगरसेविका शुभांगी सोलगावकर, विभागप्रमुख संगीता चव्हाण, माजी नगरसेवक अभय मेळेकर, धनश्री मांजरेकर, उप विभागप्रमुख दिलीप चव्हाण, बबलू चव्हाण, कार्यालय प्रमुख मधू बाणे, प्रदीप आंबवले, विलास हर्यांन व मान्यवर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..