You are currently viewing रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून जनजागृती…

रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून जनजागृती…

कणकवली /-

अपघाताचे वाढते प्रमाण व त्यात होणारे मृत्यु या पार्श्वभूमीवर वाहन चालकात जनजागृती करण्यासाठी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी आपल्या स्टाफ सह तरळे-वैभववाडी रोडवर वाहन चालकांना थांबवून वाहन चालकांना होणाऱ्या अपघातांची कारणे सांगून ते टाळण्यासाठी मोटार सायकलस्वारांनी वेगावर नियंत्रण ठेवून हेल्मेटचा वापर नियमित वापर करावा, मोबाईल संभाषण टाळावे. वळणावरील ओव्हरटेक टाळावा इत्यादी मार्गदर्शन केले. वाहतूक पोलीस अंमलदार प्रकाश गवस, सुनील निकम, विष्णू सावळ हजर होते. वाहन चालकांनी पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..