You are currently viewing ग्राहकांना खुशखबर ! किसना डायमंड ज्वेलरी चे कणकवलीत भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू.;बेलवलकर ज्वेलर्स कणकवली.

ग्राहकांना खुशखबर ! किसना डायमंड ज्वेलरी चे कणकवलीत भव्य प्रदर्शन आणि विक्री सुरू.;बेलवलकर ज्वेलर्स कणकवली.

कणकवली /-

भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या किसना डायमंड ज्वेलरीच्या हजारहून अधिक कलेक्शन असलेल्या डायमंड ज्वेलरीचे भव्य प्रदर्शन आणि विक्री श्री बेलवलकर ज्वेलर्स कणकवली येथे 15 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. दसऱ्यादिवशी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या बजेट मध्ये अगदी 4 हजार 900 रु.पासून अस्सल हिऱ्यांची खरेदी करण्याची नामी संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. ब्रँडेड हिऱ्याचे दागिने आपल्याकडे असावेत हे सर्वांचेच स्वप्न असते. अस्सल हिऱ्याचे ब्रँडेड दागिने स्त्री – पुरुषांना नेहमीच आकर्षून घेतात. नेकलेस, पेंडंट, रिंग्ज, फॅशन रिंग्ज, लेडीज ब्रेसलेट, जेन्ट्स ब्रेसलेट, मंगळसूत्र, पेंडंट सेट्स, कानातील रिंग्ज आदी डायमंड दागिन्यांच्या 10 हजारहून अधिक डिझाइन या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. किसना डायमंड चे भारतात 4 हजार 500 हुन अधिक आउटटलेट्स असून हिऱ्यांच्या दागिन्यांतील सर्वोत्तम विश्वासू ब्रँड म्हणून किसना ब्रँड ओळखला जातो.आयजीआय सर्टीफाईड आणि हॉलमार्क असलेले अस्सल डायमंड दागिने या प्रदर्शनात ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अगदी 4 हजार 900 रुपयांपासून डायमंड फॅशन रिंग्ज उपलब्ध आहेत. अवघ्या 50 हजारांत अस्सल डायमंड चे मंगळसूत्र, कानातील रिंग आणि हातातील रिंग चा सेट या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना डायमंड ज्वेलरीच्या एमआरपी वर 90 % कॅशबॅक ऑफर असून 95 % पर्यंत रक्कमेची एक्सचेंज ऑफर आहे. डायमंड स्टोन ड्रॉप ची 1 वर्ष गॅरंटी असून डायमंड ज्वेलरीवर लाईफटाइम पॉलिशिंग आणि रिपेअरिंग मोफत करून दिले जाणार आहे. किसना डायमंड ज्वेलरीचे मनपसंत अस्सल हिऱ्याचे दागिने श्री बेलवलकर ज्वेलर्स, कल्प कॉर्नर, बाजारपेठ कणकवली मोबा.नं 9422434501 / 9241936699 येथे खरेदी करण्याची नामी संधी सिंधुदुर्गवासीयांना उपलब्ध झाली आहे.

अभिप्राय द्या..