You are currently viewing आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर राबवावी .;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी..

आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर राबवावी .;भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची मागणी..

कणकवली /-

कोव्हीड काळात रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर ना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 46 डॉक्टरांचे मागील 3 महिने पगार झाले नाही. भूलरोगतज्ञ डॉक्टर ना मागील 2 वर्षे पगारच नाही. दिवसरात्र रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरना पगार मिळत नसेल तर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ कसा चालणार ? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.

जर आरोग्य यंत्रणाच मोडीत निघाली तर जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याची हमी कशी घेणार ? जिल्ह्यातील आरोग्य विभागातील 536 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागाच्या भरतीत परीक्षा केंद्रांचा घोळ होऊन परीक्षाच रद्द झाली. ती परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. राज्यस्तरीय परीक्षा घेण्याऐवजी जिल्हास्तरीय परीक्षा घ्या. एनआरएचएम च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा. यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम होईल, असे राजन तेली म्हणाले.

अभिप्राय द्या..