You are currently viewing सिंधुदुर्गात जिल्हा बँकेसह आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवणार.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गात जिल्हा बँकेसह आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवणार.;पालकमंत्री उदय सामंत

वेंगुर्ला /-


सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह जिल्ह्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत दिली.
महाविकास आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीची बैठक आज शुक्रवारी वेंगुर्ले येथे फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीबाबत माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, तसेच अरुण दुधवडकर, संदेश पारकर, एम. के. गावडे, इर्शाद शेख, श्री. डॉन्टस, जान्हवी सावंत, प्रकाश जैतापकर, अतुल रावराणे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील विकासात्मक कामांबाबत चर्चा झाली. त्याचप्रमाणे होऊ घातलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. परंतु या निवडणुकीत जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच आघाडीची बैठक होऊन वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जागावाटपा बाबत निर्णय घेण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..