युट्युब चॅनेल धारक व सोशल मिडिया पत्रकारांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश..

जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. राजेंद्र दाभाडे यांच्या यशस्वी शिष्टाईचे आभार..

सिंधुदुर्ग /-

जिल्ह्यातील चिपी विमानतळ उद्घाटन प्रवेशाचे मर्यादित क्षमतेने पास देण्यास जिल्हा प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली असून जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून,सुवर्णमध्य काढल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानून जिल्ह्यातील युट्युब चॅनेल धारक व सोशल मिडिया पत्रकारांच्या वतीने करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याचे समाधान व्यक्त करत धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती संघाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा उर्फ आबा खवणेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील चिपी येथील बहुचर्चित विमानतळाचे उद्घाटन शनिवार दि. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी होत आहे, त्या कार्यक्रमालामहाराष्ट्राच्या इतिहासात माहिती खात्याने आजपर्यंत मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या दौऱ्यात सोशल मिडीयाला परवानगी दिली नव्हती, असे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु दिवस रात्र राबवून समाजसेवेसाठी कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील पत्रकारांना यानिमित्ताने तरी मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक कार्यक्रमाला सहभागी होता यावे, यासाठी हा लढा द्यावा लागला. त्याला आम्ही यशस्वी झालो असल्याचे सांगुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या मागणीला आज खऱ्या अर्थाने यश आले आहे. चिपी विमानतळ उद्घाटनाच्या प्रवेशासाठी जिल्ह्यातील युट्युब चॅनेल धारक व सोशल मिडिया पत्रकारांना पूर्ण क्षमतेने प्रवेश देण्यात आला आहे. यामध्ये पाच पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळ उद्घाटनाच्या दिवशी आयोजन करण्यात आलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील युट्युब चॅनेल धारक व सोशल मीडिया पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला होता, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेने आक्रमक पवित्रा घेऊन विमानतळाच्या गेट समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी बोलवून घेऊन यशस्वी शिष्टाई केली. असल्याचे श्री. खवणेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माहिती व जनसंपर्क महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक तसेच जिल्हा प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page