You are currently viewing वजराट पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे गवारेड्यांकडून नुकसान

वजराट पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या भातपिकाचे गवारेड्यांकडून नुकसान

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यातील वजराट पिंपळगाव येथील शेतकऱ्यांच्या भातपिक ,आंबा,काजू कलमे यांचे मागील चार दिवसात गवारेड्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.याबाबत गवारेड्यांचा बंदोबस्त करावा,अशी मागणी येथील शेतकऱ्यांतून करण्यात आली आहे.वजराट पिंपळगाव येथील अबोली सोनसुरकर,अशोक सोनसुरकर, बाळकृष्ण सोनसुरकर, दिगंबर सोनसुरकर, काशिनाथ सोनसुरकर, अक्षय सोनसुरकर, सिताबाई सोनसुरकर इत्यादी शेतकऱ्यांचे भातपिक तसेच ३-४ वर्षे वयाची आंबा काजू ची सुमारे ५० हून अधिक कलमे यांची नुकसानी केली आहे.याबाबत वनविभागाचे अधिकारी सूर्यकांत सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत,असे सांगितले.
दरम्यान गवारेड्यांपासून झालेल्या नुकसानाबाबत नुकसान भरपाई व कायमस्वरूपी बंदोबस्त होणे बाबत ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..