You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह भाजपचे आमदार, शिवसेनेचे मंत्री व आमदारांचे विमान निघाले मुंबईहून चिपीच्या दिशेने..

केंद्रीय मंत्री नारायण राणेंसह भाजपचे आमदार, शिवसेनेचे मंत्री व आमदारांचे विमान निघाले मुंबईहून चिपीच्या दिशेने..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या चिपी येथील ‘सिंधुदुर्ग एअरपोर्ट’ चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होत आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे दुपारी चिपी विमानतळावर आगमन होणार आहे. त्यांच्यासोबत परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार निलेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, जि. प. अध्यक्षा संजना सावंत, नगराध्यक्ष समिर नलावडे, शर्वानी गावकर, सावी लोके आदी एकाच विमानाने मुंबईहून सिंधुदुर्ग एअरपोर्ट च्या दिशेने रवाना झाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा