You are currently viewing चिपी विमानतळामुळे कोकण समृद्ध होईल.;उपमुख्यमंत्री अजित पवार.

चिपी विमानतळामुळे कोकण समृद्ध होईल.;उपमुख्यमंत्री अजित पवार.

सिंधुदुर्ग /-

चीपी विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणचा विकास होणार असून, चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच सिंधुदुर्ग विमानतळाचा रनवे वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे देखील म्हणाले आहेत. हे विमानतळ होण्यासाठी सर्वच पक्षाच्या लोक प्रतिनिधींनी योगदान दिले असून, या विमानतळाचे श्रेय एकट्या कोणाला देता येणार नाही. असे मत देखील पवार यांनी व्यक्त केले. तसेच ज्या प्रमाणे या विमानतळाचे उद्घाटन महा विकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात मंजूर केलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चे देखील उद्घाटन महा विकास आघाडी करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच रत्नागिरी पासून रायगड पर्यंत जाणाऱ्या हायवेचे काम लवकरच पूर्ण होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे मत देखील त्यानी यावेळी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा