You are currently viewing राज्यस्तरीय घोषवाक्य व काव्य स्पर्धेत महक शेख हिचे यश..

राज्यस्तरीय घोषवाक्य व काव्य स्पर्धेत महक शेख हिचे यश..

मालवण /-

डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग मार्फत राज्यस्तरीय घोषवाक्य आणि स्वरचित काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आमच्या मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी महक इब्राहिम शेख हिने खुला गटातून घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक व स्वरचित काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत नेत्रदीपक यश मिळविले आहे. या यशाबद्दल छोटेखानी कार्यक्रमात महक हिचे महाविद्यालयाच्या वतीने कॉलेजच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत आणि कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी साटेलकर यांनी प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन अभिनंदन केले. सौ. साटेलकर यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्नेहा बर्वे, सूत्रसंचालन प्रा. अन्वेशा कदम, आभार प्रदर्शन प्रा. मिलन सामंत यांनी केले. यावेळी प्रा. हसन खान व प्रा. हर्षदा धामापुरकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..