You are currently viewing तब्बल १० तासानंतर सिंधुदुर्गातील वीजपुरवठा झाला सुरळीत..

तब्बल १० तासानंतर सिंधुदुर्गातील वीजपुरवठा झाला सुरळीत..

सिंधुदुर्ग /-

न्यू कोयना प्रकल्पातून निवळीला जोडणाऱ्या २२५ केवी वीज वाहिनीसह निवळी येथील उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरवठा काल सायंकाळी साडेसात पासून खंडित झाला होता. आज पहाटे सहाच्या सुमारास वीज पुरवठा पूर्वरत झाला.निवळी-पावस मार्गावरील वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने रत्नागिरी, राजापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामध्ये मुसळधार पावसाचा व्यत्यय कायम होता.

अभिप्राय द्या..