You are currently viewing मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील ३ मुले व २ मुलींची झाली निवड..

मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील ३ मुले व २ मुलींची झाली निवड..

वैभववाडी /-

मथुरा उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी वैभववाडी तालुक्यातील पवन प्रकाश साखरपेकर, राहुल रामदास धुरी, रोहित संतोष पाष्टे, या ३ मुलांची तर आशा‌ दिलिप पाटील, भक्ती विजय कोकरे या २ मुलींची महाराष्ट्र संघातून निवड करण्यात आली आहे. या सर्व खेळाडूंनी नाशिकच्या सय्यद पिंपरी येथे संपन्न झालेल्या ५ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ पुरुष व महिला टेनिस क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. निवड समितीने त्यांच्या कामगिरीची दखल घेत १७ ऑक्टोबर २०२१ पासून उत्तरप्रदेश येथील मथुरा येथे होणाऱ्या आगामी ६ व्या वरिष्ठ पुरुष व महिला राष्ट्रीय स्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघातू ते खेळणार आहेत. या सर्व खेळाडूंचे वैभववाडी तालुक्यात अभिनंदन केले जात आहे.

अभिप्राय द्या..