You are currently viewing घोटगे येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

घोटगे येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ /-

घोटगे मळेवाडी येथील माजी सरपंच सोनजी नाईक, गोपाळ नाईक ,दिलीप वाडकर यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. कणकवली विजयभवन येथे शिवबंधन बांधून पक्षाच्या शाली घालून आ. वैभव नाईक यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

गेले अनेक वर्षे भाजप पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील गावात भाजप कडून विकासकामे केली जात नाहीत. याउलट आमदार वैभव नाईक यांनी गावात विकास कामांचा धडाका लावला आहे. गावातील व्यक्तींसाठी आ. वैभव नाईक सहज उपलब्ध होतात. त्यांच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन आपण शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी यावेळी सांगितले.

यामध्ये लवू सूद, दिलीप वाडकर, अशोक नाईक, भिकाजी सूद, विठोबा सूद, उदय सूद, संतोष सूद, गोपाळ नाईक, सचिन नाईक, आबा परब,राजू परब, राज परब, नामदेव वाडकर, राकेश वाडकर, कल्पेश वाडकर,आदींनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश सावंत, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, उपविभागप्रमुख राजू परब, घोटगे उपसरपंच गीतेश सावंत,घोटगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, भावेश परब, यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घेण्यात आला.

अभिप्राय द्या..