You are currently viewing जाचक अटींमुळे विशेष प्रवर्गातील लाभार्थींना योजनांचा लाभ मिळत नाही.;राष्ट्रवादीच्या गोविंद कदम,दीपक जाधव यांचे बीडीओना निवेदन..

जाचक अटींमुळे विशेष प्रवर्गातील लाभार्थींना योजनांचा लाभ मिळत नाही.;राष्ट्रवादीच्या गोविंद कदम,दीपक जाधव यांचे बीडीओना निवेदन..

दोडामार्ग /-

महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गावातील ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असतात. यात मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती तसेच इतर लाभाच्या योजना राबविण्यात येतात, पण यासाठी असलेल्या जाचक अटीमुळे अनेक लाभार्थी याचा लाभ घेऊ शकत नाही, त्यामुळे या अटी शिथिल कराव्यात असे निवेदन दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष गोविंद कदम, दिपक जाधव व इतरांनी दोडामार्ग पंचायत समिती गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांच्याकडे केली आहे. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावांतील ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या जाचक अटीमुळे झेरॉक्स मशीन, घर दुरूस्ती, इतर लाभाच्या योजना याचा लाभ गरजू लाभार्थी यांना होत नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजनापासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय योजना याचा लाभ मिळाला पाहिजे, यासाठी गावातील सरपंच, पोलिस पाटील, -तलाठी यांचा संयुक्त दाखला घेऊन शासकीय योजनांचा लाभ द्यावा अशी मागणी गोविंद कदम, दिपक जाधव, नवराज कांबळे व इतरांनी केली आहे.

अभिप्राय द्या..