You are currently viewing सिंधुदुर्गच्या विकासासाठी सर्व पक्षीय सकारात्मकता दाखवा.;मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचे आवाहन..

सिंधुदुर्गच्या विकासासाठी सर्व पक्षीय सकारात्मकता दाखवा.;मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचे आवाहन..

मसुरे /

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस म्हणजे ९ ऑक्टोबर २०२१ हा असेल. कारण कोकण रेल्वेच्या आगमनानंतर असा मोठा अभिमानस्पद क्षण जिल्हावासीयांना अनुभवता आला नव्हता. या दिवशी, जिल्हा वासीयांनी पाहिलेलं विमान तळाचे स्वप्न पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह केंद्रीय मंत्री तथा माजी मुख्यमंत्री नामदार नारायणराव राणे, केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य सिंधिया, तसेच राज्यातील इतर मंत्री या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. विकासाचे एक नवे पर्व सुरू होताना जिल्ह्यातील प्रलंबित एमआयडीसी, सी वर्ल्ड, हाय वे आदी प्रश्नावर सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत सकारात्मक काम करण्याचे आवाहन मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
चिपी विमानतळावरन ९ ऑक्टोबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू होणार हा कोकणवासीयां साठी सोनियाचा दिवस आहे. जगाच्या नकाशावर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यातून विकासाचे नवे दालन उघडणार आहे. आपण सर्वांनी हा दिवस आनंदाने, उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन सावंत यांनी केले आहे.

सर्व पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्याना विनंती आहे की हा दिवस राजकारणाच्या पलीकडे जाऊन जिल्हा वासीयांनी उत्सवी थाटात व आनंदात साजरा करावा. ज्या प्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात विकासासाठी सर्व नेते एक होतात त्याच पद्धतीने जिल्ह्यात सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी सर्वच राजकीय नेत्यानी एक विचार करण्याचे आवाहन श्रीकांत सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा